ट्रान्स हार्बर लिंकच्या सेगमेंट कास्टिंगचे काम सुरू

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या दुसऱ्या टप्प्याच्या सेगमेंट कास्टिंगचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले. शिवडी ते न्हावाशेवादरम्यानच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाची पाहणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त आर. ए. राजीव यांनी केली.

दुसऱ्या टप्प्यात ट्रान्स हार्बर लिंकचा 7.8 किलोमीटर पूल उभारला जाणार आहे. ते बांधकाम वेगाने करता यावे म्हणून एक 2.1 किलोमीटरचा तात्पुरता पूलही उभारला गेला आहे. 60 टन वजन पेलवण्याची क्षमता या तात्पुरत्या पुलामध्ये आहे. या ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई आणि नवी मुंबईला जोडली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या