
मध्य रेल्वेने अलीकडेच मुंबई ते पुणे धावणाऱ्या डेक्कन एक्प्रेसला पारदर्शक विस्टाडोम कोच बसविला होता. यास मिळालेल्या प्रतिसादामुळे आता याच मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन एक्प्रेसलाही 15 ऑगस्टपासून विस्टाडोम कोच जोडला जाणार आहे.
मध्य रेल्वेच्या दादर-मडगाव जनशताब्दी एक्प्रेसला यंदा एलएचबी डब्यांसह पारदर्शक छताचा ‘विस्टाडोम’ कोच लावण्यात आला. तसेच प्रथमच मुंबई ते पुणे मार्गावरील डेक्कन एक्प्रेसला 26 जूनपासून विस्टाडोम कोच लावण्यात आला आहे. त्याला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे आता याच मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन एक्प्रेसलाही पारदर्शक ‘विस्टाडोम’ कोच स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर लावण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक 02124 पुण्याहून सकाळी 07.15 वाजता सुटेल आणि सकाळी 10.25 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 02123 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सायंकाळी 5.10 वाजता सुटेल आणि रात्री 8.25 वाजता पुण्याला पोहोचेल. नवीन जोडल्या जाणाऱ्या विस्टाडोम कोचमधील बुपिंग 8 ऑगस्ट रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण पेंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

























































