
केबीसीच्या 17 व्या सीझनमध्ये सहभागी झालेला इशित भट्ट याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. इशित भट्ट ज्या पद्धतीने केबीसीचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांना उर्मटपणे उत्तरे देत होता ते पाहून नेटकऱयांनी संताप व्यक्त केला. इशित भट्ट हा सहावीत शिकत असून मूळचा गुजरातचा आहे.
तो हॉट सीटवर आल्यावर, मला नियम सांगण्यात वेळ घालवू नका, मला सर्व माहीत असल्याचे त्याने म्हटले. यानंतरही प्रश्नाचे चार पर्याय सांगण्यापूर्वीच तो त्याची अत्यंत उर्मटपणे उत्तरं देत होता. यावेळी अमिताभ बच्चन यांनी अत्यंत संयमीपणे सर्व परिस्थिती सांभाळली. मात्र अशाच प्रकारे उद्धटपणे उत्तर देत असताना त्याने चुकीचा पर्याय निवडला आणि रिकाम्या हाताने त्याला घरी परतावे लागले.