ट्रीओ इलेक्ट्रिक रिक्षाचे उद्योग मंत्र्यांच्या हस्ते अनावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलीटीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक रिक्षाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले. वाढत्या इंधनदरवाढीला आळा घालण्यासोबत पर्यावरण पुरक वाहन निर्मितीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण आणले. त्यानुसार राज्यात 2030 पर्यंत बहुतांश इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर असतील. या धोरणात इलेक्ट्रिक वाहन उत्पादक आणि ग्राहकांना अनुदान देण्याची तरतूद आहे. या धोरणास ऑटोमोबाईल कंपन्यांकडून प्रतिसाद लाभत असून आज महिंद्रा कंपनीने ट्रिओ नावाची इलेक्ट्रिक रिक्षा बाजारात आणली. त्यांचे अनावरण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान, मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात ऑटो रिक्षा चालविल्या जातात. येत्या काळात मुंबईच्या रस्त्यावर या इलेक्ट्कि रिक्षा धावतील. यासाठी रिक्षा संघटना पुढाकार घेईल. कंपनीने देखील यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे, असे श्री. देसाई म्हणाले. ट्रिओ रिक्षाची किंमत आठ लाख रुपये इतकी असेल. प्रत्येक किलोमीटरमागे केवळ पन्नास पैसे खर्च येणार आहे.