म्हणे, नराधमांच्या आईवडिलांचाही विचार केला पाहिजे, महिला आमदाराने घेतला आक्षेप

773

पशुवैद्यक डॉक्टर महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील नराधमांच्या एन्काऊंटरवर सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) महिला आमदाराने आक्षेप घेतला आहे. डॉक्टर महिलेवरील बलात्कार व तिची झालेली हत्या याचे दुख आहेच, पण आम्हाला त्या आरोपींबाबतही सहानुभूती आहे. त्यांच्या आईवडिलांना किती दुख झाले असेल याचाही विचार केलाच पाहिजे, असे विधान आमदार जी. सुनीता यांनी केले आहे.

हैदराबाद पोलिसांचे विविध स्तरांतून कौतुक होत असताना सत्ताधारी पक्षाच्याच आमदार महिलेने एन्काऊंटरविरोधात सूर आळवला आहे. सुनीता यांच्या विधानाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. घटनेची माहिती काही मिनिटांत मिळाली असतानाही पोलीस मदतीसाठी तत्काळ पोहचू शकले नाहीत. त्या महिलेच्या बाबतीत जे घडले ते अत्यंत दुखदायी आहे. महिलेवर अन्यायच झाला. त्याचे आम्हाला दुŠख आहे, मात्र नंतर चार आरोपींना मारण्यात आले हेदेखील वेदनादायी आहे, असे आमदार सुनीता यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाची क्लिप मंगळवारी काही टीव्ही चॅनेल्सवर प्रसारितही केली गेली.

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश करणार एन्काऊंटरची चौकशी
हैदराबाद एन्काऊंटरच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा विचार केला जाईल असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने बुधवारी स्पष्ट केले. याप्रकरणी तेलंगणा उच्च न्यायालय आधीपासूनच सुनावणी करीत आहे. या प्रकरणाची दिल्लीमध्ये राहणाऱया सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे असे आम्हाला वाटत असल्याचे खंडपीठाने नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या