राजधानी एक्सप्रेसला ट्रकची धडक, मोठी दुर्घटना टळली

30

सामना ऑनलाईन । रतलाम

त्रिवेंद्रम – निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. गोध्रा आणि रतलाम रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी 6 वाजून 44 मिनीटांनी हा अपघात झाला. रेल्वे फाटकावर लाल सिग्नल असतानाही ट्रक चालकाने सिग्नल तोडला. मात्र रेल्वे रुळ ओलांडत असताना तेथून जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसवर हा ट्रक धडकला. त्यामुळे राजधानी एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून, ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. मात्र सुदैवाने ट्रेनमधील प्रवाशांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या