डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, रॉड्रिगेज यांचे बदलले सूर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिल्यानंतर व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांनी अमेरिकेच्या सुरात सूर मिळविले आहेत. व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्षांनी माझे न ऐकल्यास मादुरो यांच्यापेक्षाही जास्त मोठी किंमत मोजावी लागेल, अशी धमकी ट्रम्प यांनी एका माध्यमसमूहाला दिलेल्या मुलाखतीत दिली होती. रॉड्रिगेज यांनी शनिवारी जनतेसमोर येऊन संबोधित करताना म्हटले होते की, कोणत्याही परिस्थितीत व्हेनेझुएला कोणाचाही गुलाम होणार नाही.

अजूनही मीच अध्यक्ष – मादुरो

‘अमेरिकेच्या ताब्यात असलेले निकोलस मादुरो यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले. मी अजूनही व्हेनेझुएलाचा अध्यक्ष आहे,’ असे मादुरो यांनी यावेळी न्यायाधीशांसमोर सांगितले.