व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबारात एक गार्ड ठार, दुसरा गंभीर, ट्रम्प यांची माहिती

Trump National Guard Member Dies Day After White House Shooting, Another Fighting for Life

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले की, व्हाईट हाऊसजवळ आदल्या दिवशी झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या दोन नॅशनल गार्डपैकी एक, सारा बेकस्ट्रॉम यांचा मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या सैनिकाची प्रकृती अद्याप गंभीर आहे.

थँक्सगिव्हिंग (Thanksgiving) सुट्टीनिमित्त अमेरिकन सैनिकांशी व्हिडिओ कॉल सुरू करण्यापूर्वीच बेकस्ट्रॉम यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी बेकस्ट्रॉम यांचे वर्णन ‘अत्यंत आदरणीय, तरुण आणि उत्कृष्ट व्यक्ती’ अशा शब्दात केले आहे. ‘ती तरुण महिला, सारा बेकस्ट्रॉम… तिचा मृत्यू झाला. ती खूप महान होती’, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ट्रम्प यांनी सैनिकांना संबोधित करताना पुढे सांगितले, ‘दुसरा गार्ड जीवन मरणाची लढाई लढत आहे. त्याची अवस्था खूप गंभीर आहे’.