
सामना ऑनलाईन । कोची
‘शबरीमाला’ मंदिरात प्रवेश करणाऱ्यासाठी पोहोचलेल्या भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांची शबरीमालाच्या समर्थकांनी कोंडी केली आहे. तृप्ती देसाई यांनी परत फिरावे, अन्यथा त्यांना आमच्या छाताडावर पाय ठेवून शबरीमालात प्रवेश करावा लागेल, असा इशारा विमानतळाबाहेर ठाण मांडून बसलेले कार्यकर्ते राहुल अवस्थी यांनी दिला आहे.
Trupti Desai should go back. She will have to step on our chests and walk over us if she wants to enter #SabarimalaTemple: Activist Rahul Easwar protesting outside Kochi airport pic.twitter.com/QQoyzYVIVM
— ANI (@ANI) November 16, 2018
तृप्ती देसाई या पहाटे पासून कोची विमानतळावर ठाण मांडून बसल्या आहेत. शबरीमालात प्रवेश केल्याशिवाय आपण परत फिरणार नाही, असा त्यांनी निश्चय केला आहे. आपल्याला शबरीमालात पोहोचता येऊ नये म्हणून टॅक्सी चालकांना देखील धमकावण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तृप्ती देसाई विमानतळावरच अडकल्या, शबरीमलासाठी एकही टॅक्सी तयार होईना!



























































