
सामना ऑनलाईन । कोची
‘शबरीमला’ मंदिरात प्रवेश करण्यासाठी कोची येथे दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांना विमानतळावरच रोखण्यात आलं आहे. तसेच त्यांना त्यांच्या निश्चित करण्यात आलेल्या निवास्थानापर्यंत नेण्यासाठी एकही टॅक्सी चालक तयार नसून त्यांना धमकवण्यात आल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे.
We reached Cochin Airport at 4:30 am. Protests were being held outside. We booked Taxi 2-3 times but drivers have been threatened that their vehicle will be vandalised if they offer us a drive. Police have said that we can’t go outside now: Trupti Desai pic.twitter.com/ksHAAPzejb
— ANI (@ANI) November 16, 2018
तृप्ती देसाई यांना कोची विमानतळापासून निश्चित ठिकाणापर्यंत न्यायला कोणी टॅक्सीचालक तयार नसल्याचं त्यांनी सांगितलं. टॅक्सी चालकांनी तसं केल्यास त्यांच्या वाहनाचं नुकसान करण्यात येईल असं धमकावण्यात आल्याचा आरोप देखील देसाई यांनी केला आहे. या प्रकाराबद्दल देसाई यांनी संताप व्यक्त करत आम्हाला घाबरवून परत पाठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश मिळावा असा निकाल दिल्यानंतर देखील मंदिर विश्वस्त आणि भक्तांचा त्याला विरोध आहे. मात्र हा विरोध झुगारून मंदिरात जाण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई थेट कोचीमध्ये दाखल झाल्या. पहाटे 4:30 वाजता त्यांचं विमान कोचीमध्ये दाखल झालं. असं असंल तरी त्यांना विमानतळावर पोलिसांनी रोखलं आणि बाहेर न पडण्याचा सल्ला दिला. कारण विमानतळा बाहेर शबरीमलाच्या समर्थकांकडून जोरदार निदर्शन सुरू होती. अखेर पोलिसांनी निदर्शनं करणाऱ्या आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न झाला. मात्र तरी देखील आंदोलक तिथेच उभे राहून विरोध करत राहिले. अखेर काही काळ विमानतळाच्या बाहेर पडू नये, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं.




























































