हे करून पहा – अचानक चक्कर आली तर…

बऱ्याच जणांना अचानक चालत असताना किंवा काम करत असताना चक्कर येते. जर तुमच्या बाबतीत असं झालं तर सर्वात आधी चक्कर येत असताना चालण्याचा प्रयत्न करू नका. त्वरित खाली बसा किंवा झोपा आणि शक्य असल्यास डोळे मिटून घ्या. शक्य असल्यास शांत आणि अंधाऱ्या खोलीत बसा.

अपचनामुळे चक्कर येत असल्यास, आलं (आल्याचा चहा) किंवा हलके जेवण घेणे फायदेशीर ठरू शकते. उठताना किंवा बसताना हळू आणि सावकाश हालचाल करा, ज्यामुळे तोल जाण्याची भीती कमी होते. जर चक्कर येण्याची समस्या वारंवार होत असेल किंवा गंभीर असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.