हे करून पहा दाढ दुखत असेल तर…

दाढदुखी होत असेल तर सर्वात आधी एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून 30 सेकंद चूळ भरा. हे हिरडय़ांमधील सूज कमी करण्यास मदत करू शकते. स्वच्छ आणि सुती कपडय़ात बर्फाचा तुकडा ठेवून दाढ दुखत असलेल्या बाहेरच्या भागात काही मिनिटे ठेवा. यामुळे सूज आणि वेदना कमी होतात.

लवंग तेलाचे काही थेंब कापसावर घेऊन दुखऱया दाढीवर लावा. हे वेदना कमी करण्यास मदत करू शकते. उशीवर डोके ठेवून काही वेळ विश्रांती घ्या. कारण सपाट पडून राहिल्याने काही वेळा दात आणि दाढ दुखणे थांबू शकते. जर दाढदुखी जास्त असेल तर तत्काळ दातांच्या डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्या.