पुऱ्या मऊ होण्यासाठी हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीठ चाळून घेतल्याने पिठात असलेले कण निघून जातात, त्यामुळे पुरीचे पीठ चांगले मळले जाते.

कणीक मळताना त्यात पीठ, 1 चमचा रवा किंवा चिमूटभर साखर घाला.

पीठ मळून झाल्यावर कापडाने 10 मिनिटे झाकून ठेवा.

ठरलेल्या वेळेनंतर पुन्हा एकदा हाताने पीठ हलके मळून घ्या.

पुऱया खुसखुशीत राहण्यासाठी पीठ मळताना त्यात 1 चमचा तेल आणि थोडेसे दही मिसळावे.

पुऱ्या तळताना तेल अतिशय कडकडीत गरम असावे.