टीएसटीटीएची दिया चितळे राज्य टेबल टेनिस स्पर्धेची विजेती

82 व्या महाराष्ट्र राज्य स्पर्धा टेबल टेनिस अजिंक्यपदासाठी सुरू असलेली स्पर्धा शुक्रवारीदेखील रंगतदार ठरली.उपनगर टेबल टेनिस संघटनेने माजी महापौर डॉ. रमेश प्रभू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थआयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी युथ फायनल गटात टीएसटीटीएच्या दिया चितळे हिने 13-11, 11-05, 11-07, 11-07, 4-0 अशी चुरशीची लढत देत ठाण्याच्या श्रेया देशपांडेचा पराभव केला. यावेळी प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार व बक्षिसे वितरण करण्यात आले. यावेळी संकुलाचे विश्वस्त व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या