…तर लोकांना जबरदस्ती घरात बसवावे लागेल, तुकाराम मुंढे यांचा इशारा

1092

जर नागरिकांनी बाहेर पडणे कमी केले नाही तर आम्हाला लोकांना जबरदस्तीने घरात बसवावे लागेल, असा इशारा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

लोकांनी लॉकडाऊनचा अर्थ समजून घेतला पाहिजे. सर्वांनी आपल्या घरात राहावे. कोरोनाची लागण कोणालाही होऊ नये हा यामागचा उद्देश आहे, मात्र लोकांमध्ये परिस्थितीचे गांभीर्य दिसत नाही. महानगरांमध्ये जीवनावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद करण्याचा निर्णय सरकारला नाइलाजास्तव घ्यावा लागला आहे. आता सर्व करूनही जर लोकांना कळत नसेल तर जबरदस्ती लोकांना घरी बसवायला लागेल. आम्हाला असे करण्यास भाग पाडू नका, असे मुंढे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या