मुंडेंच्या समर्थनार्थ नागपूरकर रस्त्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या उपराजधानीत गेल्या दोन दिवसांपासून नागपूर महापालिकेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सभा त्याग केल्या नंतर नागपूरकर जनता मुंढेंच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली आहे. सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांकवर आरोप केल्यानंतर नागपूरची जनता आयुक्तांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र आहे.

शनिवारी सभा स्थगित केल्यानंतर मंगळवारी भट सभागृहात आयोजित करण्यात आली होती. आयुक्त सभेत येतात की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना आयुक्त सभागृहात आले. तत्पूर्वी युवक काँग्रेस, युवा सेना, प्रहार संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर समर्थनार्थ उतरली होती. विविध पक्षाचे विविध रंगाचे झेंडे सत्ताधारी भाजपला विरोध करण्यासाठी मुंढेंच्या समर्थनार्थ एकत्र आले आहे. एकच मुंढे विरोध करणारे गुंडे… असे नारे देण्यात आले. युवक काँग्रेसचे बंटी शेळके, युवा सेनेचे विक्रम राठोड आदी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रदर्शन केले.