सुपेंकडे आणखी चार कोटींची बेहिशेबी मालमत्ता

टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी, राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त आणि शिक्षणाधिकारी तुकाराम सुपे यांच्याकडे नव्याने 3 कोटी 95 लाख 35 हजारांची मालमत्ता आढळून आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने केलेल्या तपासणीत ही बाब उघड झाली असून, सुपे यांनी ही मालमत्ता त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावावर केल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी त्यांच्याकडे 3 कोटी 59 लाख 99 हजारांची मालमत्ता आढळून आली होती.