कोजागिरी पौर्णिमेला तुळजापूर निर्मनुष्य, यात्रा रोखण्यात प्रशासनाला यश; व्यापारी वर्गाची आर्थिक कोंडी

कोरोना संकटकाळात आलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीची कोजागिरी पौर्णिमा यात्रेत भाविकांना येण्यास रोखण्यामध्ये प्रशासनाला चांगले यश प्राप्त झाले. तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या उपस्थितीत मर्यादित संख्येत तुळजाभवानी देवीचे कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक कार्यक्रम आई राजा उदो उदो.. च्या जयघोषात संपन्न झाले.

तुळजाभवानी देवीच्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने भाविकांना मंदिरामध्ये दर्शन बंदी असल्यामुळे तुळजाभवानी मंदिरात अत्यंत मर्यादित आणि आवश्यक व्यक्तींना प्रवेश देण्यात आला होता. यामध्ये तहसीलदार सौदागर तांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुजारी निखिल प्रकाश पाटील यांनी तुळजाभवानी देवीची मुख्य पूजा केली आणि उपस्थितांना मळवट भरून आशीर्वाद दिला.

मध्यरात्री एक वाजता तुळजाभवानी देवीची सीमोल्लंघन नंतर सुरू झालेली श्रम निद्रा पूर्ण झाली, याप्रसंगी महंत तुकोजी महाराज, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर कदम, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले यांच्यासह इतर पुजारी बांधव उपस्थित होते. विधिवत आणि परंपरागत पद्धतीने तुळजाभवानी देवीच्या श्रम आणि त्यानंतर धार्मिक कार्यक्रम करण्यात आले देवीला दही दुधाचे अभिषेक करण्यात आले.

सकाळी अभिषेक पूजा संपन्न झाल्यानंतर भवानी मातेची नित्योपचार पूजा आणि आरती अंगारा काढण्यात आला, दरम्यान काल दुपारपासून पुणे येथील होंडाईचे उद्योजक नरेश जवाहरलाल किराड आणि त्यांच्या इतर तीन सहकारी कुटुंबीयांनी मुंबई, पुणे, बंगळुरू या भागातून आणलेल्या दर्जेदार आणि उच्च प्रतीच्या फुलांच्या सहाय्याने त्यासाठी आवश्यक असणारे 65 कुशल कामगारांनी तुळजाभवानी मंदिराचा गाभारा, मुख्य सिंहासन, चांदीचा दरवाजा, पितळी दरवाजा, सिंह गाभारा, मुख्य मंदिराच्या तीन बाजू, तसेच  कृष्ण विहार ओवरी, मंदिराच्या संरक्षक भिंती, गोंधळी पार, सीमोल्लंघन पार, निंबाळकर दरवाजा, गणपती मंदिर, गोमुख तीर्थ, राजे शहाजी महाद्वार व राजमाता जिजाऊ महाद्वार अशा प्रमुख ठिकाणी अत्यंत नेत्रदीपक आणि आकर्षक फुलांची सजावट केली.

screenshot_2020-10-31-18-38-38-508_com-google-android-gm

या संसर्गाचे आपत्तीच्या काळामध्ये आपत्कालीन व्यवस्था मध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार यांच्या कार्याची नोंद घेणारा फुलांचा देखावा मंदिरात परिसरात साकारण्यात आला होता. आई तुझा आशिर्वाद अशा शब्दांमध्ये त्यांनी फुलांमधून करण्यात आलेली शब्दरचना लक्षवेधी होती. मंदिराच्या शिखराच्या खालील बाजूस फुलांनी सजवलेले तोरण आणि फुलांची केलेली ही आकर्षक सजावट तुळजाभवानी मंदिराच्या इतिहासाला उजाळा देणारी ठरली.

फुलांची सजावट तुळजाभवानी देवीची सेवा करण्याच्या उद्देशाने आम्ही गेल्या पाच वर्षापासून करीत आलो आहोत. आम्ही सर्व कुटुंबीय आणि चार भाऊ यामध्ये तुळजाभवानी देवीवरील अपार श्रद्धा आणि नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील परंपरेप्रमाणे या फुलांच्या सजावटी मधून देवीची सेवा करीत आहोत, अशी प्रतिक्रिया उद्योजक नरेश किराड यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दिली.

65 कामगार दीड दिवसापासून सतत फुलांची सजावट करण्याचा कामांमध्ये व्यग्र आहेत. त्यांनादेखील तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्याची संधी मिळाल्यामुळे ते आपल्या आयुष्याचे सोने झाल्याच्या अनुभवाने अत्यंत श्रद्धापूर्वक सजावट करीत होते. यामध्ये फुलांच्या कलाकारांनी 600 पेंडया नारंगी झेंडू, 600 पेंडया पिवळा झेंडू, 1 हजार पेंडय़ा अथुरियाम फुले, 800 पेंडय़ा पांढरी शेवंती, 100 पेंडय़ा पिवळी शेवंती, 200 पेंडय़ा अष्टर फुले, 50 पेंडय़ा तुकडा गुलाब, 250 पेंडय़ा मिक्स गुलाब, 50 पेंडय़ा करुनियन फुले, 20 बंडल जिप्सी, 400 बंडल काळ्या रंगाचे घास, 25 पेंडय़ा पर्पल ऑर्किड फुले, 10 पेंडय़ा पांढरे ऑर्किड फुले अशी विविधरंगी आणि आकर्षक सुमारे 5 हजार पेंडयाची सजावट मंदिर परिसरातील करण्यात आली होती.

इतिहासात पहिल्यांदाच भाविकाना कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. पोलीस प्रशासन आणि तुळजापूर पासून येणाऱया सर्व मार्गावर सीमा बंद करून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता

आपली प्रतिक्रिया द्या