
आज पहाटे तीन वाजता नांदेड शहरातील शिवाजीनगर, एमआयडीसी परिसरात बारा दुकानांना आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने विविध ठिकाणावरुन अग्निशमन बंब आणून या आगीवर तीन तासात नियंत्रण मिळविले.
आज पहाटे तीन वाजता शिवाजीनगर एमआयडीसी परिसरातील शॉर्टसर्कीटमुळे बारा दुकानांना आग लागली. अग्निशमन दलाला श्रीनिवास रुद्रावार यांनी तातडीने माहिती दिल्यानंतर नांदेड, अर्धापूर, नायगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठ करत या आगीवर तीन तासात नियंत्रण मिळविले. या आगीत शेख अब्दुल रौफ भाई यांच्या प्रिंटींग प्रेसच्या मशिनलाही आग लागली होती. त्यात चार ते पाच लक्ष रुपयांचे नुकसान झाले. तसेच अदनान समी यांच्या फर्निचरच्या दुकानाला आग लागून जवळपास सहा ते सात लाखाचे नुकसान झाले. यात सागवान लाकूड, वेगवेगळ्या मशीन व अन्य सामानाचा समावेश आहे. सय्यद सोएब यांच्या भंगार दुकानाला आग लागून एक ते दोन लाखाचे नुकसान झाले. तसेच महंमद अफजल यांच्या फर्निचरच्या दुकानाला आग लागून यातील मशनरी व फर्निचरचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले.
इरफान पठाण यांच्या कोहिनूर स्टिलला आग लागून एक ते दोन लाखांचे नुकसान झाले. जमीर भाई यांच्या सागवान लाकडाच्या दुकानाला आग लागून दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले. मजहर काझी यांच्या फर्निचरच्या दुकानाला आग लागून दोन ते तीन लाखाचे नुकसान झाले. अमर फर्निचर वर्क्स या दुकानालाही आगीने वेढले. त्यात त्यांचे तीन लाखांचे नुकसान झाले. गुलझार फर्निचर वर्क्सच्या दुकानाला आग लागून दोन लाखाचे नुकसान झाले. मतीन फर्निचर वर्क्स, अकबर फर्निचर वर्क्स या दुकानांही आग लागून जवळपास चार लाखाचे नुकसान झाले. तीन तासानंतर अग्निशमन दलाच्या नांदेड, नायगाव व अर्धापूर येथील अग्निशमन दलाच्या बंबने ही आग विझविण्यात आली.


























































