ट्विंकलच्या कानात कांद्याचे झुमके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ट्विंकलने कानात कांद्याचे झुमके घातले आहेत. कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असताना ट्विंकलने त्याचेच झुमके घालून फोटो काढला आहे. पती अक्षय कुमारने हे झुमके भेट दिल्याचे तिने सांगितले आहे. टिंवकलने इन्स्टाग्रावर हा स्पेशल फोटो पोस्ट करीत लिहिलंय, एका शूटनंतर दुसरे शूट…पण ही मौल्यवान वस्तू तू माझ्यासाठी आणलीस, त्याचा  मला आनंद आहे. कांद्याला कोंब येण्याआधीच ते घालण्याची संधी मला मिळाली. माझा नवरा ‘द कपिल शर्मा शो’चे शूटिंग पूर्ण करून घरी आला. झुमके करिनाला त्या लोकांनी दाखवले होते, पण ती इप्रेस झाली नाही. मला वाटलं, तुला हे नक्कीच आवडतील. म्हणून  मी हे तुझ्यासाठी घेऊन आलोय’ असे तो मला म्हणाला. कधी कधी अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टी तुम्हाला आनंद देऊन जातात, असेही तिने हा फोटो पोस्ट करताना लिहिलंय.