ट्विटरला टक्कर देणार स्वदेशी Tooter; नेटकरी म्हणाले, ‘ही तर ट्विटरची कॉपी’

ट्विटरला टक्कर देण्यासाठी आता स्वदेशी सोशल नेटवर्क Tooter सज्ज झालं आहे. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट Tooter बद्दल अनेक नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक लोक ही वेबसाइट ट्विटरची कॉपी असल्याचे म्हणत आहेत. तर काही लोक हे स्वदेशी असल्याचं म्हणत या वेबसाइटवर साईन-इन करण्यास सांगत आहे. मात्र Tooter हे दिसायला ट्विटर सारखंच आहे.

Tooter चा स्किन कलर आणि स्टाईल ट्विटरशी प्रेरित किंवा कॉपी दिसते. पण यात ट्विटरच्या पक्ष्याऐवजी शंखाचे चित्र वापरण्यात आले आहे.

काय आहे Tooter ?

Tooter ने दावा केला आहे की ही हिंदुथानात बनवण्यात आलेली सोशल नेटवर्किंग साईट आहे. Tooter च्या अबाउट सेक्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘आम्हाला असं वाटत की हिंदुस्थानचा स्वतःचं सोशल नेटवर्क असायला हवं. याच्याशिवाय आपण फक्त अमेरिकन ट्विटर इंडिया कंपनीची डिजिटल कॉलनी आहोत, ती ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा वेगळी नाही. Tooter आपलं दवदेशी आंदोलन 2.0 आहे.’

Tooter हे ट्विटर सारखेच आहे. Tooter वर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अनेक नामवंत लोकांचे अकाऊंट असल्याचे बोलले जात आहे. Tooter साईन इन करताच तुम्हाला स्वतः Tooter चे सीईओ फॉलो करतील, असंही बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या