
ब्लू टिक आणि गोल्डन टिकनंतर आता ट्विटर युजरचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी पैसे मागणार आहे. ट्विटरने स्पष्ट केले की, ते आता केवळ सशुल्क सदस्यांना त्यांची खाती सुरक्षित करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन पद्धत म्हणून मजकूर संदेश वापरण्याची परवानगी देणार आहेत. मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ट्विटरच्या सर्व सेवा विनाशुल्क होत्या. मात्र उद्योगपती ऍलन मस्क याने कोटय़वधी रुपये खर्च करून ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर ट्विटरच्या प्रत्येक सेवेसाठी युजरकडून पैसे घेतले जात आहेत.



























































