बेड्यासह दोन आरोपी पोलीस ठाण्यातून फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कळंब

कळंब पोलीस ठाण्यामधून अटक केलेले दोन आरोपी फरार झाले असून या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली आहे. ही घटना २४ ऑगस्ट रोजी घडली आहे. कळंब तालुक्यातील पाथर्डी येथील येथील पारधी समाजातील दोन संशयित व्यक्तींना कळंब पोलिसांनी अटक केली होती. या आरोपीच्या हातात बेड्या असताना हे आरोपी कळंब पोलीस ठाण्यातून फरार झाले आहेत. आरोपींना पळविण्यात पोलिसांचा हात असल्याची चर्चा सध्या तालुक्यात आहे.

कळंब पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पाथर्डी पारधी वस्ती वरील दोन संशयित व्यक्तींना २४ ऑगस्ट रोजी पहाटेची गस्त सुरू असताना अटक केली होती. या दोन संशयित व्यक्तींना कळंब पोलीस ठाण्यात बेड्या घालून आणण्यात आले होते. परंतु हे दोन आरोपी कळंब पोलीस ठाण्यामधून फरार झाले म्हणून यांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी बेदम मारहाण केली असून त्यांना कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

हे आरोपी पोलीस ठाण्यामधून कसे फरार झाले हे कळंब पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना ही माहीत नाही. या आरोपींना पकडण्यासाठी कळंब पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली होती. परंतु अटक केलेले आरोपी कुणाच्या मेहरबानीने फरार झाले आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

summary- two accused fled from jail