गलवानमध्ये लष्कराच्या वाहनावर दरड कोसळली; दोन अधिकारी शहीद

लडाखमधील गलवान खोऱयातील चारबाग भागात लष्कराच्या वाहनावर दरड कोसळून झालेल्या अपघातात दोन अधिकारी शहीद तर तीन जखमी झाले. जखमींना हेलिकॉप्टरच्या मदतीने रुग्णालयात पाठवण्यात आले.

गलवान खोऱ्यातील चारबाग भागात असलेल्या लष्कराचा काफिला बुधवारी सकाळी दुरबूग येथून चोंगताशकडे जात असताना अचानक भूस्खलन होऊन भली मोठी दरड लष्कराच्या वाहनावर कोसळली. या भीषण अपघातात 14 सिंध हॉर्स पलटणीचे लेफ्टनंट कर्नल भानूप्रतापसिंग मनकोटिया आणि लान्सनायक दलजितसिंह हे शहीद झाले तर मेजर मयंक शुभम, मेजर अमित दीक्षित आणि कॅप्टन गौरव हे गंभीर जखमी झाले.