
सामना प्रतिनिधी, मुंबई
औषधाच्या निर्मितीकरिता उपयुक्त असलेले सी हॉर्स (समुद्री पाणघोडे) तस्करीप्रकरणी आणखी दोन जणांना वनपालक्षेत्र कार्यालयाच्या कांदळवन पथकाने चेन्नई येथून ताब्यात घेतले. रहमान आणि अबू बकर सिद्दीकी अशी त्या दोघांची नावे आहेत. त्याच्या चौकशीत आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. सी हॉर्स (समुद्री पाणघोडे)ची तस्करी होणार असल्याची माहिती कांदळवन विभागाच्या अधिकाऱयांना मिळाली होती.
त्यानुसार अधिकाऱयांनी 7 मार्चला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सादिक बाशा जमाल मोहिद्दीनला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 30 किलो मृत सी हॉर्स जप्त केले. सी हॉर्सची तस्करी केल्याप्रकरणी सादिकविरोधात वनस्पती सुरक्षा कायदानुसार गुन्हा दाखल केला. त्याच्या चौकशीत रहमान आणि अबूचे नाव समोर आले. एका गुह्यात रहमान आणि अबू हे दोघे चेन्नईच्या तुरुंगात असल्याचे कळल्यानंतर कांदळवन विभागाने त्या दोघांना पुढील चौकशीकरिता मुंबईमध्ये आणले.





























































