पतपेढीच्या पैशाच्या अपहारप्रकरणी दोघांना अटक 

एका खासगी पतपेढीच्या पैशाच्या अपहारप्रकरणी दोघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार हे कांदिवली येथे राहतात. ते एका पतपेढीमध्ये अध्यक्ष म्हणून काम करतात. तेथे अटक आरोपी हे काम करत होते. गेल्या दोन वर्षांत त्याने खातेदारांकडून काही रक्कम घेतली होती, मात्र ती रक्कम पतपेढीत जमा केली नव्हती.

हा प्रकार उघडकीस आल्यावर तक्रारदार याने कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली.