
पुणे शहर परिसरात वाहनचोरी करणार्या दोघांना अटक करून चंदननगर पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या. प्रणव प्रभात शर्मा (25), रोहीत मुकेश सिंग (18, रा. दोघे. सणसवाडी, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
चंदननगर परिसरात चोरी झालेल्या दुचाकींचा शोध घेत असताना संशयीत आरोपी आंबेडकर वसाहत भागात असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून शर्मा, सिंग यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी दुचाकी चोरी कबूली दिली. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरिंवद कुमरे, अंमलदार श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, सुभाष आव्हाड, गणेश हांडगर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.