सातारा तालुक्यात तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सातारा तालुक्यातील गवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन चिमुकल्यांचा सारखळच्या तलाकात बुडून मृत्यू झाला. या हृदयद्राकक घटनेने परिसर गलबलला. पोहता येत नसतानाही तलावात पोहण्याचा प्रयत्न चिमुकल्यांच्या जीवावर बेतला आहे.

स्वराज सतीश घोरपडे (11) व सोहम संतोष घाडगे (10) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. गवडीच्या प्राथमिक शाळेत स्वराज घोरपडे हा इयत्ता पाचवीत, तर सोहम घाडगे हा इयत्ता चौथीत शिक्षण घेत होता.

स्वराज आणि सोहम हे मित्र संग्राम सोनवणे याच्यासह शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर नजीकच्या सारखळ तलाकामध्ये पोहण्यासाठी गेले. त्यातील स्वराज व सोहम पोहण्यासाठी तलावामध्ये उतरले. मात्र, पोहता येत नसल्याने ते बुडू लागले. मदतीसाठी त्यांनी टाहो फोडला; मात्र, तिघांशिवाय जवळपास कोणीही नक्हते. पाण्यात न उतरलेला संग्राम या प्रकाराने भेदरून गेला. त्याने पळत घरी जाऊन कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. तोपर्यंत या परिसरात शेतीची कामे करत असलेल्या शेतकऱयांना ही घटना समजली. त्यांनी तलावाकडे धाव घेत सोहम व स्वराज यांचा पाण्यात शोध घेतला. पाण्यातून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. ग्रामस्थांनीही घटनास्थळी गर्दी केली होती. चिमुकल्यांच्या या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.