दिल्ली विद्यापीठातील दोन कॉलेजला धमकी

दिल्ली विद्यापीठातील दोन कॉलेजला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. रामजस कॉलेज आणि दक्षिण दिल्लीतील देशबंधू कॉलेजला ई-मेल पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. धमकीचा ई-मेल आल्यानंतर दिल्ली पोलीस, बॉम्बशोधक पथकांनी पॅम्पसमध्ये जाऊन सर्वत्र तपासणी केली, परंतु या ठिकाणी पोलिसांना कोणतीही संशयित वस्तू आढळली नाही. मे 2024 मध्येही दिल्ली विद्यापीठातील अनेक कॉलेजांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. या कॉलेजमध्ये लेडी श्री राम कॉलेज, हंस राज कॉलेज आणि रामजस कॉलेजचा समावेश होता.