गोव्यातील खाडीत मोटार बुडून पुण्यातील दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

भरधाव मोटार झाडाला धडकून उलटल्यामुळे गोव्यातील खाडीत बुडून पुण्यातील तरुण तरुणीचा मृत्यू झाला आहे. शुभम देडगे (वय 25) आणि ईश्वरी देशपांडे (वय 28) अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हा अपघात सोमवारी पहाटे गोव्यातील बारदेश तालुक्यातील हडफेश खाडीत घडला आहे.

खाडीत बुडत असताना तरुण तरुणीने वाचवा वाचवा असा आवाज दिला होता. मात्र, पहाटेच्या सुमारास त्यांच्या मदतीला कोणीही गेले नाही. सोमवारी सकाळी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शुभम देडगे आणि त्याची मैत्रीण ईश्वरी देशपांडे मोटारीतून गोव्याला गेले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास ते गोव्यातील हडफेश खाडीजवळून जाताना अचानक त्यांची मोटर झाडाला धडकली. त्यामुळे मोटार उलटून खाडीत पडली. त्यामुळे दोघांनी जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. मात्र, कोणीही जवळ नसल्याने त्याना जीव गमवावा लागला. दोघेही तरुण तरुणी पुण्यातील असून त्यांचा नेमका पत्ता समजु शकलेला नाही.