बंधाऱ्यावरून जाताना बसला विजेच्या खांबाचा धक्का, मामा-भाचीचा मृत्यू

499
shock

नगरच्या पारनेर तालुक्यातील जवळा परिसरतील मामा-भाचीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विजेचा धक्का लागून या दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

बंधाऱ्यावर जवळील विजेच्या खांबाची तार तुटून शेजारून वाहणाऱ्या ओढ्यात पडली होती. तार तुटल्याचे लक्षात न आल्याने शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला. सुभाष सोमा जाधव (वय-38), सोनाली देशमुख (वय-19) अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या