
मार्लेश्वर मार्गावरील कासारकोळवण येथे बावनदीवर पोहायला गेलेले दोघेही बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळी पोलीस, स्थानिक ग्रामस्थ, राजु काकडे हेल्प ॲकॅडमीचे कार्यकर्ते हजर आहेत.
हे युवक हातीव गावातील असून काल दुपारी ते नदीवर गेले होते. संध्याकाळी परत न आल्याने त्यांचा शोध सुरू झाला. घटनास्थळी त्यांची मोटारसायकल सापडल्याने ते बुडाल्याचा अंदाज धरून शोध मोहीम सुरू करण्यात आली.
कासारकोळवण बावनदीत बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. पहिला मृतदेह मासे पकडणाऱ्या गोपाळ बांधवांनी शोधून काढला तर दुसरा मृतदेह शोधण्यात राजु काकडे हेल्प ॲकॅडमीच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे.

























































