
दहिसर येथील खदानीत दोन जण बुडाल्याची घटना आज सायंकाळी घडली. अजय जोगदंड आणि शेखर विश्वकर्मा अशी त्या दोघांची नावे आहेत. शेखरचा मृतदेह बाहेर काढला असून रात्री उशिरापर्यंत अजयचा शोध घेण्यात येत होता
गोराईचे रहिवासी असलेले अक्षय, शेखर आणि त्याच्यासोबत पाचजण खदानीत पोहण्यासाठी उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते सातही जण बुडू लागले. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला. त्यांनी याची माहिती दहिसर पोलिसांना दिली. काहीच वेळात दहिसर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले. या घटनेची माहिती समजताच परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे हे घटनास्थळी आले. अग्निशमन दलाने सर्च ऑपरेशन सुरू करून पाच जणांना सुखरूप बाहेर काढले. तर खदानीत बुडालेल्या अक्षय आणि शेखरचा शोध घेण्यात येत होता. रात्री शेखरला बाहेर काढले. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर रात्री उशिरापर्यंत अक्षयचा शोध घेतला जात होता.



























































