मेफेड्रोन विक्रीसाठी आणणाऱ्या महिलेसह दोघांना अटक; सव्वा तीन लाखंचे मेफेड्रोन जप्त

550

पुण्यात अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या एका महिलेसह दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सव्वा तीन लाख रुपये किंमतीचे मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला.

विवेक तुळशीराम लुल्ला (वय 43) आणि हेमा किसनलाल सिंग (वय 30, दोघेही रा.नवी मुंबई) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक रायकर आपल्या सहकाऱ्यांसमवेत गस्त घालत होते. त्यावेळी बाणेर येथील नॅशनल इंन्शोरंन्स अकॅडमीजवळ दोनजण एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांच्या पथकाने नॅशनल इंन्शोरंन्स अकॅडमी परिसरात सापळा लावला. त्यावेळी तेथे एक महिला आणि एक पुरुष संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे 65 ग्रॅम वजनाचे आणि सव्वा तीन लाख रुपये किंमतीचा मेफेड्रोन हा अंमली पदार्थ सापडला. त्यांच्याविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या