
ब्रिटनमध्ये दोन वृद्ध शीख व्यक्तींना काही तरुणांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी वंशभेदाच्या या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला. ब्रिटनमधील वॉल्व्हर हॅम्प्टन येथील रेल्वे स्थानकासमोर 15 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांना जामिनही मिळाला आहे.