इगतपुरीत दोघांवर प्राणघातक हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, इगतपुरी

इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील तळेगांव येथील दोघांवर तलवारी व चाकूच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला झाला. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इगतपुरी पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना अटक केली असून इतर संशयित आरोपी फरार असल्याचे समजते.

तळेगांव येथील अतुल रायकर (23), शिवराम रायकर (40) हे दोघे गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास इगतपुरीत दूध टाकुन घरी जात होते. यावेळी तळेगावातील संशयित आरोपी गजानन ऊर्फ नंदु मनोहर, अजय मनोहर, सुरज नेटावटे, प्रमोद नेटावटे, विनोद नेटावटे, शंकर सदगीर यांच्यासह आणखी चार-पाच जणांनी त्यांना तळेगाव येथील मुंबई आग्रा महामार्गावर अडवले. मात्र तिथून अतुल व शिवराम रायकर घरी पळाले. मात्र तळेगांवजवळ या दोघांना सर्व संशयितांनी गाठुन त्यांच्यावर तलवारी व चाकु हल्ला केला. या हल्ल्यात अतुल रायकर, शिवराम रायकर हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना नाशिक येथील वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी जखमींची अवस्था चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक येथील अशोका हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारार्थ पाठवले. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इगतपुरी पोलीसांनी या गुन्हयातील संशयित आरोपी गजानन उर्फ नंदु मनोहर व शंकर सदगीर यांना अटक केली आहे. आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. उर्वरित आरोपीअजय मनोहर, सुरज सयाजी नेटावटे, प्रमोद सयाजी नेटावटे, विनोद सयाजी नेटावटे फरारी आहेत.

summary- two got attacked in igatpuri