
सामना ऑनलाईन । पलामू
झारखंड मधल्या पलामू भागात यज्ञ करण्याच्या जागेवरून दोन गटांत वाद झाला. या वादाचे रुपांतर मोठ्या हिंसेत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या आणि बॉम्ब फेकले. यज्ञस्थळावर झेंडा रोवण्याचा प्रयत्न एका गटाने केला. दुसर्या गटाने त्यांना रोखल्यानंतर हा वाद झाला.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती ताब्यात घेतली. आठवड्याभरापूर्वी यज्ञस्थळावरून वाद झाला होता. तेव्हा प्रशासनाने या भागात जमावबंदी लागू केली होती. बुधवारी दोन्ही गटांत चर्चा होणार होती, परंतु सकाळी एका गटाकडून यज्ञस्थळी धार्मिक झेंडा लावला गेला. त्यामुळे परिस्थिती चिघळली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आहे.


























































