राष्ट्रवादीत दोन गट, निवडणूक आयोगापुढे 6 ऑक्टोबरला सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आपणच राष्ट्रीय अध्यक्ष आहोत असे सांगत अजित पवार यांनी संपूर्ण पक्षावरच दावा सांगितला आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा हा दावा निवडणूक आयोगापुढे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून फेटाळून लावला असला तरी राष्ट्रवादीत दोन गट असल्याचा निष्कर्ष निवडणूक आयोगाने काढला असून दोन्ही गटांना 6 ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी पाचारण केले आहे.

आयोगाकडे अधिकृतपणे उपलब्ध असलेली सर्व माहिती विचारात घेतल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन विरोधी गट असल्याच्या निष्कर्षाप्रत आयोग पोहोचला आहे. हे दोन्ही गट आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस असा दावा करत असल्यामुळे 1968 च्या निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेशाच्या परिच्छेद 15 नुसार याप्रकरणी सखोल विश्लेषणाची गरज आहे. यामुळे आयोगाने दोन्ही गटांना 6 ऑक्टोबर रोजी अधिकृत प्रतिनिधीमार्फत सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.