जालन्यामध्ये 2 गावठी हातभट्टी दारु अड्डे उद्ध्वस्त; सव्वा लाखांची दारु जप्त

582

जुना जालना, संजय नगर येथील 2 गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून 1 लाख 25 हजाराची दारु जप्त केली. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात अवैध दारु विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने दारुबंदी पथक तयार केले.

संजय नगर येथे बाळु तात्याराव गायकवाड याच्याकडून शनिवारी 59 हजाराची गावठी दारु जप्त करण्यात आली. तसेच त्याच्या शेजारील पत्राच्या शेडमध्ये एका महिलेकडून 66 हजाराचे दारुसाठी लागणारे रसायन जप्त करण्यात आले. याबाबत कदीम जालना पोलीस ठाण्यात दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधिक्षक समाधान पवार, स्थागुशा पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारु विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक संपत पवार, पो.ना. सुभाष पवार, सुरेश राठोड, धनाजी कावळे, दिलीप कांबळे, राजेंद्र येलदोडे, सुरेश नलावडे, पो.कॉ. किशोर जाधव, आकाश कुरील, परमेश्‍वर धुमाळ, पवन नारियलवाले, महिला पो.कॉ. पुजा सोमकांबळे, रोहिणी पांचाळ, चालक धोंडीराम मोरे यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या