सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर शहरातील गोलाईमधून डिक्कीमध्ये ठेवलेले अडीच लाख रुपये पळवण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश नारायण भुतडा रा. मोतीनगर, लातूर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. गोलाई मध्ये त्यांच्या ज्युपिटर (क्रमांक एम.एच.२४ एपी २४२४) मधील डिक्कीमधून अज्ञात चोरट्याने २ लाख ५० हजार रुपये पळवून नेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जळगट्टे हे करीत आहेत.

































































