छत्तीसगढमध्ये चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

211
फाईल फोटो

छत्तीसगढ येथील दंतेवाडा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या सशस्र चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ही चकमक कटेकल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुनगा येथील जंगलात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या दोन्ही नक्षलवाद्यांवर एक-एक लाख रुपयांचे इनाम ठेवण्यात आले होते. चकमकीनंतर परिसराची कसून छाननी करण्यात आली तेव्हा तेथे पोलिसांनी मोठय़ा प्रमाणावर स्फोटके आणि शस्त्रास्त्र जप्त केली. दंतेवाडा भागात पोलिसांची शोधमोहीम अजूनही सुरू आहे. कारण अजूनही तेथे काही नक्षलवादी लपून राहिल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एस. पी. अभिषेक पल्लव यांनी या चकमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या