लातूरातील दोन शिवसैनिक शिवतीर्थांकडे पायी रवाना

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास शिवतिर्थांवरील हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी लातूर ते मुंबई पायी येऊन दर्शन घेऊ, असा संकल्प चंद्रकांत माणिकराव कांबळे व दिपक झुंबर जाधव या दोन शिवसैनिकांनी केला होता. आता ते लातूरहून शिवतीर्थाकडे पायी निघाले आहेत.

राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतिर्थांवरच शपथ घेतली. त्यामुळे केलेल्या संकल्पाप्रमाणे शनिवारी दयानंद गेट लातूर येथील शिवसेनेच्या शहर कार्यालयात तुळजाभवानी मातेची आरती करून चंद्रकांत कांबळे व दिपक जाधव यांनी शिवतीर्थाकडे पायी प्रवासास सुरुवात केली. त्यांच्या या प्रवासास शुभेच्छा देण्यासाठी शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंकर रांजणकर, उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे, शहर प्रमुख रमेश माळी आदींसह नागरिकही उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या