ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दोघांचा चिरडून मृत्यू

29

सामना ऑनलाईन । नगर

राहुरीमध्ये ऊसाचा ट्रक आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. तालुक्यातील राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे डाक बंगल्याजवळ आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला असून बाबासाहेब ससे, रवींद्र तुकाराम दांगट अशी मृतांची नावे आहेत.

ससे व दांगट हे दोघे वांबोरी येथून दुचाकीवरून चालले होते. रात्रीच्या वेळी भरधाव वेगातील उसाच्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटला. त्याने दुचाकीवरील दोघांना चिरडले. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक ट्रक जागेवरच सोडून पसार झाला.

या अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविले. मृताच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या