RCB च्या विजयोत्सवाला गालबोट, चिन्नास्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरी, अकरा जणांचा मृत्यू

आयपीएल 18 चे विजेतपद जिंकल्यानंतर रॉयल चॅलेजर्स ऑफ बंगळुरूसाठी कर्नाटक सरकारने सत्कार सोहळ्याचे आयोजन चिन्नास्वामी स्टेडियमवर केले होते. या स्टेडियममध्ये RCB च्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी चेंगराचेंगरी झाली असून त्यात 11 जणांचा मृत्यू तर 33 जण जखमी झाले आहेत.

चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने RCB च्या खेळाडूंचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक मिळवण्यासाठी हजारो चाहते स्टेडियम बाहेर उपस्थित होते. यावेळी स्टेडियममध्ये घुसण्यासाठी चाहते झाडांवर, भिंतींवर चढत होते. त्यावेळी गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला. दरम्यान यावेळी झालेल्या चेगंराचेंगरीत चार जणांचा मृत्यू झाल्याच समजते.