दिल्ली विमानतळावर दोन विमाने धडकली, अकासाचे विमान उड्डाणासाठी सज्ज होत असताना दुर्घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सिंग करत असताना स्पाईस जेटच्या विमानाची अकासा एअरच्या विमानाशी टक्कर झाली. या धडकेत दोन्ही विमानांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला किंवा क्रू मेंबरला इजा झाली नाही.

अकासा एअरच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून हैदराबादकडे जाणारे त्यांचे विमान क्यूपी 1406 हे उड्डाणासाठी तयार असताना बे क्षेत्रात परत आणावे लागले. विमान पार्किंगमध्ये स्थिरावलेले असताना अन्य एअरलाइनचे विमान त्याला धडकले. अपघातानंतर लगेचच सर्व प्रवासी आणि कर्मचारी यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अकासा एअरच्या ग्राउंड टीमने तातडीने पर्यायी व्यवस्था करून प्रवाशांना हैदराबादला पोहोचवण्याची तयारी सुरू केली. प्रवक्त्याने स्पष्ट केले की, विमान बे परिसरात उभे असताना ही टक्कर झाली आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

स्पाईस जेट एअरलाइन्सनेही आपल्या निवेदनात ही घटना सविस्तर सांगितली. स्पाईस जेटचे बी 737-700 हे विमान दिल्ली विमानतळावर टॅक्सिंग करत असताना दुसऱ्या विमानाशी त्याची टक्कर झाली. या अपघातात स्पाईस जेटच्या विमानाच्या उजव्या बाजूच्या विंगलेटचे नुकसान झाले, तर दुसऱ्या एअरलाइनच्या विमानाच्या डाव्या बाजूच्या हॉरिझॉन्टल स्टेबिलायझरलाही मोठा धक्का बसला. खबरदारीचा उपाय म्हणून स्पाईस जेटने त्या विमानाला दिल्ली विमानतळावर थांबवून ठेवले आहे.

दोन्ही एअर लाइन्सने तत्काळ संबंधित विमान प्राधिकरण आणि अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दुर्घटनेनंतर विमान सेवा सुरळीत करण्यासाठी कंपन्यांनी प्रयत्न केले.

दिल्लीहून हैदराबादकडे जाणारे आकासाचे विमान क्यूपी 1406 हे उड्डाणासाठी तयार असताना बे क्षेत्रात परत आणावे लागले. विमान पार्किंगमध्ये स्थिरावलेले असताना अन्य एअरलाइनचे विमान त्याला धडकले.