आरपीएफचे दोन जवान कोरोना पॉझिटिव्ह

603

रेल्वे सुरक्षा दलाचे दोन जवान कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे वृत्त आहे. हे जवान पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात ड्यूटीवर होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

यापैकी एक अधिकारी (एस‌एसआय) सहाय्यक सुरक्षा निरीक्षक दर्जाचा असून मुंबई सेंट्रल येथे अन्नपदार्थांची पाकिटे वाटण्याच्या ड्यूटी बजावत असताना त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मुंबई सेंट्रल भागातील अन्नपदार्थ वाटप कार्यक्रमातून नेमक्या कोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याला संसर्ग झाला हे शोधून काढणे अवघड असल्याचे एका अधिकायाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या