आयएनएस ब्रम्हपुत्रासह दोन जहाजे सिंधुदुर्गात दाखल

भारतीय नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर मालवणात नौदलाची जहाजे यायला सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी आयएनएस ब्रम्हपुत्रासह दोन जहाजे सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात दाखल झाली. आयएनएस ब्रम्हपुत्रा या जहाजाने याआधी तारकर्ली ते मालवण दरम्यानच्या समुद्रात यशस्वी संचलन केले आहे. तारकर्लीसमोरील समुद्रात नौदलाकडून विविध कसरतींचा सराव सुरू आहे.