धाराशिवमध्ये दोन दुकाने जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशिवमध्ये दोन दुकानांना शॉर्टसर्किटने भीषण लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एकीकडे गावात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने अगोदरच गावात चिंतेचे वातावरण असताना या घटनेमुळे त्यात भर पडली आहे.

शिरढोण तालुक्यातील शिवाजी चौकातील हनुमान मशनरी व राठोड टेलरिंग या दोन्ही दुकानात रात्री दीड ते अडीच या दरम्यान शॉर्टसर्किटने भीषण आग लागली. या आगीमध्ये मशनरी दुकानातील विद्युत मोटारी, वायर, मशनरी, पाईप तसेच गहू, ज्वारी पशुखाद्य व टेलरिंग दुकानातील 23 ड्रेस, शिलाई मशीन, दुकान फर्निचर जळून सुमारे 9 लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या मशनरी दुकानाचे मालक हनुमंत दिगंबर नरवडे टेलरिंग दुकानाचे मालक शंकर काशिनाथ राठोड यांनी शॉर्टसर्किटमुळे झालेल्या नुकसानीची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली आहे.