कर्जत येथे नदीत बुडून दोन मैत्रिणींचा मृत्यू

सामना प्रतिनिधी। कर्जत

कर्जत तालुक्यातील कळंब या ठिकाणी आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मायरा सर्फराज पटेल (वय 9वर्ष) आणि तय्याबा सुहेल ताडे (वय 7वर्ष) अशी या मुलींची नावे आहेत.

रविवार असल्याने सुटीच्या दिवशी मायरा आईसोबत कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होती. यावेळी तिची मैत्रीण तय्याबाही तिच्यासोबत होती. आईची नजर चुकवून मायरा व तय्याबा पाण्यात उतरल्या. पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या. त्यात दोघींचा मृत्यू झाला.

दरम्यान,  दोन्ही मुली आपल्याला नदीवर सोडून पुन्हा घरी गेल्या असाव्या असे त्यांचा आईला वाटले. कपडे धुवून झाल्यानंतर आई घरी गेली. मात्र  दोन्ही मुली घरी आल्याचं नसल्याचं तिला समजले. त्यानंतर घरातल्यांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. नदीवर या दोघी  गेले असल्याने प्रथम त्यांनी नदीवर ह्या दोघींचा शोध घेतला. तेंव्हा या दोघी नदीच्या दगडांच्या कपारीमध्ये मृतावस्थेत आढळल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी दोन्ही बहिणींचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.

summary…two sisters drawn in river at karjat