झारखंडमध्येच्या चाईबासामध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट, कोब्रा बटालियनचे दोन जवान जखमी

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात कोब्रा बटालियनचे दोन जवान जखमी झाले. पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासा येथील सारंडा जंगलात शुक्रवारी सकाळी 10.40 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. जवान नक्षलवादविरोधी मोहीम असताना ही घटना घडली. जखमी जवानांना सारंडा जंगलातून एअरलिफ्ट करून रांचीतील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

सारंडा जंगलात भाकपा माओवादीचे नेते मिसिर बेसरा आणि अनमोलसह अनेक नक्षली सक्रीय आहेत. यामुळे सुरक्षा दल सतत या परिसरात नक्षलवादविरोधी मोहीम राबवत आहेत. नक्षलवादी आयईडी स्फोट घडवून सुरक्षा दलांना हानी पोहचवण्याचा प्रयत्न करतात. सुरक्षा दलांकडून परिसरात शोध मोहीम सुरूच असून नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करत आहेत.